Wed, Apr 24, 2019 07:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 500 गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल

500 गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल

Published On: Aug 07 2018 1:42AM | Last Updated: Aug 07 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

गौरी-गणपतीच्या सणाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 2225 बस सोडण्यात येणार आहेत. या गणपती स्पेशल गाड्यांच्या ग्रुप बुकिंगला आतापर्यंत चाकरमान्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. या बसगाड्यांपैकी मुंबई विभागातील 500हून अधिक बसगाड्यांचे ग्रुप बुकिंग फुल्ल झाले आहे. 1 ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग सुरु करण्यात आले.

प्रत्येक सणावेळी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी परिवहन मंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. मागील वर्षी परिवहन विभागाने कोकणात जाण्यासाठी 2121 गाड्या सोडल्या होत्या. त्यातील सुमारे 1300 गाड्यांचे बुकिंग अगोदरच पूर्ण झाले होते. परिवहन महामंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात 8 ते 12 सप्टेंबर या काळात  2225 गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरुनगर, पनवेल, उरण या आगारातील सुमारे 500 गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. अवघ्या 5 दिवसांत या गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

बुकिंगसाठी बेवसाईट 

मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल आगारातील तर 259 गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाल्याचे एसटी महामंडळाकडोन सांगण्यात आले. हे आरक्षण 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या काळासाठी करण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या बुकिंगपैकी सर्वाधिक म्हणजेच 189 गाड्यांचे ग्रुप बुकिंग 11 सप्टेंबर या दिवसासाठी करण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगसाठी प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधून बुकिंग करावे, असे आवाहन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे. एसटीचे संगणकीय आरक्षण 9 ऑगस्टपासून खुले होणार असून  महामंडळाच्या https://public.msrtcors.com या वेबसाईटवरुन बुकिंग करता येणार आहे.