Thu, Jan 17, 2019 06:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

Published On: Aug 28 2018 3:45PM | Last Updated: Aug 28 2018 3:45PMमुंबई : प्रतिनिधी

केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ पाठविण्यात आली. ही तूरडाळ घेऊन कुर्ला टर्मिनल्‍स येथून नेत्रावती एक्‍सप्रेस आज (२८ ऑगस्‍ट) रवाना झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रेल्‍वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 

क्रेडाई एमसीएचआय, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, संचालक नियंत्रण कक्ष दौलत देसाई, नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, उपनियंत्रक शिधावाटप मधुकर बोडके, चंद्रकांत थोरात, माजी अपर मुख्य सचिव शेहजाद हुसैन तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.