Mon, Aug 19, 2019 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५० लाख बुडवण्यासाठी बलात्काराची दिली धमकी

५० लाख बुडवण्यासाठी बलात्काराची दिली धमकी

Published On: May 16 2019 2:08AM | Last Updated: May 16 2019 1:33AM
मुंबई : प्रतिनिधी

कपड्याचा व्यवसायासाठी दिलेल्या 50 लाख रुपयांचा अपहार करून पैशांची मागणी करणार्‍या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करून धमकी देऊन दोन भावांनी तिचा विनयभंग केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दोन्ही भावासह तिघांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. लालजी धरमसी सांधा, जिग्नेश धरमशी सांधा आणि कौसिक किर्तीभाई ठक्कर अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

या दोघांनी पुन्हा पैशांची मागणी केल्यास तक्रारदार महिलेचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, तसेच तिच्यावर बलात्काराचे प्रात्यक्षिक करण्याची धमकी दिली होती. 32 वर्षांची ही महिला जोगेश्‍वरी परिसरात तिच्या वयोवृद्ध आईसोबत राहते. तिचा सलूनचा व्यवसाय असून पाच वर्षांपूर्वी तिची रमेश रमजी सांधा याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. यावेळी रमेशने तिला भागीदारीमध्ये कपड्याचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे प्रपोजल दिले होते. त्यानुसार तिने गुंतवणूक म्हणून त्याला 50 लाख रुपये दिले होते. मात्र, त्याने त्या रकमेचे व्याज दिले नाहीच; परंतु धंद्यात नुकसान झाल्याचे सांगून तो तिला टाळत होता. 

दरम्यान रमेशच्या दोन भावांकडून तिला धमकी दिली जात होती. पैशांची मागणी केल्यास त्यांच्याकडे तिचे काही फोटो आहेत. ते फोटो मॉर्फ करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी ते दोघेही तिला देत होते. 

सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही महिला तिच्या आईसोबत घरी होती. यावेळी तिथे लालजी, जिग्नेश आणि कौसिक असे तिघे आले. कौसिक हा दरवाज्यावर उभा होता. तर इतर दोघांनी तिच्याशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तिच्यावर बलात्कार कसा होतो याचे प्रात्यक्षिक करण्याची धमकी देत पुन्हा पैशांची मागणी करू नकोस अशी धमकी दिली होती. यावेळी त्याने तिला मारहाणही केली होती. घडलेल्या प्रकाराने तक्रारदार महिला आणि तिची आई प्रचंड तणावात होत्या. 

स्थानिक रहिवाशांना ही माहिती समजताच त्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला केला. त्यानंतर रात्री तिने ओशिवरा पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना अंधेरीतील चार बंगला, म्हाडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. होते.