Wed, Sep 19, 2018 10:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : ५ शाळकरी मुले कालपासून बेपत्ता

नवी मुंबई : ५ शाळकरी मुले कालपासून बेपत्ता

Published On: Sep 06 2018 3:06PM | Last Updated: Sep 06 2018 3:06PMनवी मुंबई : प्रतिनिधी

रबाले येथील ५ शाळकरी मुले बुधवारी दुपारपासून  बेपत्ता झाल्याने रबाले परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मुलांच्या पालकांनी आज गुरूवारी सकाळी बेपत्ता झाल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेली पाचही मुले रबालेमधील आदिवासी कातकरी पाड्या मध्ये राहणारे आहेत. काल बुधवारी दुपारी शाळेजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येते.  हे सर्व एकाच शाळेतील विद्यार्थी आहेत. ते इयत्ता २ री ते ६ वी मधील शिकणारे विद्यार्थी असून यापूवीर्ही ही मुले अशाच पध्दतीने खेळकरवृतीने मज्जा करण्यासाठी निघुन गेले होते.

बेपत्ता झालेल्यांची नावे शंकर तेजवंत सिंह (वय ११), गगन तेजवंत सिंह (वय ८) अर्जुन ढमढेरे (वय ११) रोहित जैस्वाल (वय १३) अनिस आदिवासी (वय ११) अशी आहेत. ही सर्व मुले रबाले मधील राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थी आहेत. याबाबत डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल ठाणे लोकल ट्रेन मध्ये ही मुले फिरताना सीसी टिव्ही फुटेज मध्ये आढळून आले आहे.