Fri, Nov 16, 2018 03:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ५ जण ठार

मुंबई : एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ५ जण ठार

Published On: Apr 30 2018 3:00PM | Last Updated: Apr 30 2018 3:00PMनवी मुंबई :प्रतिनिधी 

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर सोमवारी पहाटे आदईगावालजवळ एका ओमनीला पाठीमागून भरधाव वेगाने कलिंगड घेऊन जाणाऱ्या टेंम्पोने धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण ठार झाल आहेत. अपघातातील सर्व मृत मुंबईतील मानखुर्द परिसरातील आहेत.

पहाटेचा बाजार हाती लागण्यासाठी पुण्याहून हा टेम्पो चालक भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने निघाला होता. कंळबोली जवळ असलेल्या आदई गावाजवळ याच मार्गाने आलेली एक ओमनी कार बंद पडली होती. पाठीमागून धक्का मारून कारला चालू  करण्याचा प्रयत्न सुरू असताना काही क्षणात पाठीमागून आलेल्या कलिंगड टेंम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि पाच जण चिरडले गेले. त्यात तीन जणांचा जागीच मृत्‍यू झाला तर, दोघा जणांचा कंळबोली एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारारम्‍यान मृत्‍यू झाला.  

Tags : Mumbai Pune Expressway, accident,  tempo,