होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतात ‘फोर-जी’चा स्पीड पाकिस्तानपेक्षाही कमी 

भारतात ‘फोर-जी’चा स्पीड पाकिस्तानपेक्षाही कमी 

Published On: Feb 23 2018 8:51AM | Last Updated: Feb 23 2018 8:51AMमुंबई : प्रतिनिधी

भारतात 4-जी नेटवर्कचा वेग हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कमालीचा धीमा आहे. आश्‍चर्य म्हणजे हा वेग पाकिस्तानपेक्षाही कमी आहे, असे ‘ओपनसिग्‍नल’ या मोबाईल अ‍ॅनालिटिक्स कंपनीने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा पॅक, वॉईस कॉल्सच्या किमती घटवल्या आहेत. त्यामुळे इंटरनेटवापरणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र, ओपनसिग्‍नल या मोबाईल अ‍ॅनालिटिक्स कंपनीने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार देशात 4-जीचा वेग हा सर्वाधिक कमी आहे. हा वेग पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया या देशांपेक्षाही कमी आहे. 6 खंडातील जवळपास 88 देशांतील 4-जी डाऊनलोड स्पीडची चाचणी केली यात भारत देश खूपच मागे आहे. भारतात 4-जीचा वेग सरासरी 6 एमबीपीएस इतका आहे. अनेकदा तो यापेक्षाही कमी असतो. तर पाकिस्तानमध्ये मात्र हा वेग भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे 14 एमबीपीएस आहे. अल्जेरियामध्येही हा वेग 9 एमबीपीएस आहे, असेही ‘ओपनसिग्‍नल’ने म्हटले आहे.