Mon, May 20, 2019 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ४५८ बार, हुक्का पार्लर्स होणार सील

४५८ बार, हुक्का पार्लर्स होणार सील

Published On: Jan 05 2018 2:01AM | Last Updated: Jan 05 2018 2:01AM

बुकमार्क करा
ठाणे : खास प्रतिनिधी

मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील दुर्घटनेच्या पोर्शभूमीवर अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेबाबत 72 तासांची नोटीस देवूनही त्याची दखल न घेतलेल्या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा धाडसी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका हद्दीतील जवळपास 458 आस्थापना तातडीने सील करण्याचे आदेश जयस्वाल यांनी संबंधित सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत.

ठाणे शहरातील ज्या 500 चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेल्स, लाऊंज बार, हुक्का पार्लर्सनी अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला सादर केलेला नाही अथवा महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनिय 2006 च्या तरतुदींचे पालन केलेले नाही अशा सर्व आस्थापनांना महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार विविध आस्थापनांना 26 सप्टेंबर, 2017 रोजी 7 दिवसांची नोटीस देण्यात आली होती.

सदर नोटीस दिल्यानंतर एकाही आस्थापनेने कागदपत्रे सादर न केल्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांना पुन्हा 30 डिसेंबर, 2017 रोजी 72 तासांत आपली कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देण्यात आली होती परंतु ती नोटीस दिल्यानंतरही ज्या आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदींची पुर्तता केलेली नाही अशा सर्वआस्थापना कोणतीही नोटीस व सूचना न देता या आस्थापना आग प्रतिबंधक कायद्याचे पालन करीत नाहीत तसेच त्यांच्याकडे त्या अनुषंगाने वैध कागदपत्रे व अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नाही या कारणात्सव तात्काळ सील करण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले आहेत.