Mon, May 27, 2019 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील ४४९८ संस्थांची नोंदणी रद्द

मुंबईतील ४४९८ संस्थांची नोंदणी रद्द

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:51AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष करणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना दणका दिल्यानंतर आता धर्मादाय संस्थांकडे मोर्चाकडे वळवला असून धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील राज्यातील तब्बल 60 हजार संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील 4498 संस्थांचा समावेश आहे. तर जवळपास 1 लाख 30 हजार संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यांचे नोंदणी रद्द केलेल्या संस्था उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभरात सुमारे 8 लाख संस्थांची सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत नोंदणी झालेली आहे. यातील 3 लाख 95 हजार 308 संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या सक्रिय नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये नियमांची पूर्तता न करणार्‍या ट्रस्टचा धर्मादाय आयुक्तांनी आढावा घेतला. विश्वस्तांची यादी तसेच संस्थेचे उद्देश आणि अन्य इत्थंभूत माहिती संस्थेची नोंदणी केल्यानंतर देणे बंधनकारक असते. तसेच त्यासोबत ऑडिट रिपोर्ट देखील सादर करणे बंधनकारक असते. ऑडिट रिपोर्ट तसेच विद्यमान ट्रस्टींची किंवा ट्रस्टमधील फेरबदलाची माहिती यातील 1 लाख 90 हजार संस्थांनी न दिल्यामुळे अशा सर्व संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. संस्थांकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे धर्मादाय आयुक्ता शिवकुमार डिगे यांनी सांगितले.

नोंदणी रद्द करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नागपूरमधील सर्वाधिक संस्थांचा समावेश आहे. नागपूरमधील सुमारे 14 हजार 853 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर लातूरमधील 8, 613, नाशिकमधील 7, 528, औरंगाबादमधील 6,966 आणि पुण्यातील 5,167 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. मुंबईतील 4,498 संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे.

शिवकुमार डिगे यांनी काही महिन्यांपूर्वी धर्मादाय रुग्णालयांनाही असाच दणका दिला होता. मोठ्या धर्मादाय रुग्णालयाकडून गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर डिगे यांनी या रुग्णालयांना दणका दिला होता.