Fri, Apr 26, 2019 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरार लॉटरीतील ४०%  घरे  विजेत्यांनी म्हाडाला केली परत

विरार लॉटरीतील ४०%  घरे  विजेत्यांनी म्हाडाला केली परत

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:15AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या कोकण मंडळाने 2014 आणि 2016 साली काढलेल्या लॉटरीमधील सुमारे चाळीस टक्के घरे विजेत्यांनी म्हाडाला परत केली आहेत. दोन्ही लॉटरीमध्ये सुमारे 4 हजार 400 घरे म्हाडाने लॉटरीमध्ये काढली होती, यातील सुमारे 1 हजार 900 घरे म्हाडाला परत केली असल्याची माहिती समोर आली आहे. म्हाडाच्या वाढीव किंमतीमुळे आणि म्हाडामार्फत दिरंगाईने होणार्‍या प्रक्रियेमुळे आपली घरे परत केली. 

म्हाडा परवडणार्‍या दरामध्ये घरांच्या किंमती असल्याचा दावा करून लोकांना आकर्षित करते. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून म्हाडाच्या घराच्या वाढलेल्या किंमती एकून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. म्हाडा कोकण मंडळाद्वारे विरारच्या बोळिंज परिसरामध्ये 2014 आणि 2016 रोजी सुमारे पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. यातील ज्या विजेत्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांना अद्याप ऑफर लेटरही देण्यात आलेले नाही. परिणामी, लोकांनी म्हाडाला ही घरे परत दिली आहेत. 2014 साली म्हाडाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी घरांच्या किंमती कमी केल्या. तरीही 2016 च्या लॉटरीसाठी लोकांना घरांकडे आकर्षित करण्यात म्हाडा अपयशी ठरले. 

म्हाडाने 2016 साली जाहीर केलेल्या लॉटरीतील विरार येथील घरे तेथील घरांची खाजगी विकासकांच्या घरापेक्षा जास्त महाग असल्याने येथील घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला होता. लॉटरीतील इतर घरांपेक्षा विरार येथील घरे महाग का ? असा प्रश्न त्यावेळीही उपस्थित करण्यात आला होता. ही तफावत केवळ जागा कमीजास्त असल्याने नसून विविध योजनाचे निकष वेगवेगळे असल्यामुळे दिसून येत असल्याचे म्हाडाच्या कोकण विभागाने त्यावेळी स्पष्ट केले होते. 

Tags : Mumbai, 40% houses, Virar lottery, returned, MHADA, form winners, Mumbai news,