Mon, Mar 25, 2019 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत धावणार ४० इलेक्ट्रिक बस

मुंबईत धावणार ४० इलेक्ट्रिक बस

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी 

इंधनाचा वाढता खर्च, मुंबईतील प्रर्दुषण यावर उपाय म्हणून बेस्टने इलेक्ट्रीक बसला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सहकार्याने 20 एसी मिडी व 20 साध्या मिडी इलेक्ट्रीक बस घेण्यात येणार आहेत. या बसच्या खरेदीसाठी फेम इंडिया अंतर्गत सरकार सबसिडी देण्यार असून या प्रस्तावाला सोमवारी बेस्ट समितीने मंजूरी दिली.

केंद्र सरकारने देशातील 7 सार्वजनिक वाहतुक करणार्‍या उपक्रमांना इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी आर्थिक निधीची मदत देऊ केली आहे. त्यामध्ये बेस्ट उपक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे प्रदूषण विरहित बसगाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 40 मिडी इलेक्ट्रिक बस केंद्र शासनाच्या मदतीने घेणार आहे. या बसेस 7 वर्षाच्या भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. या बसची प्रत्येकी दीड कोटी रुपये इतकी किंमत असून दीड कोटी रुपयांपैकी 60 लाख रुपये केंद्र सरकार प्रोत्साहनपर देणार आहे.तर बेस्टने 90 लाख रुपये भरायचे आहेत. पण हे पैसे बेस्ट ऐवजी कंत्राटदार भरणार आहे. कंपनीला बसेस पुरविण्याचे कंत्राट दिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यांमध्ये 25 टक्के बसगाड्या आणि उरलेल्या 75 टक्के बसगाड्या सहाव्या महिन्यापर्यत पुरविण्यात येणार आहेत. 

दरम्यान 450 नविन बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक बसचा हा प्रस्ताव न्यायालयाच्या कचाट्यात येणार नाही याची शहानिशा केली जावी, अशी मत यावेळी भाजपाचे बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी व्यक्त केले.