Mon, May 20, 2019 18:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रसिद्ध सिनेनिर्मात्याच्या ४ वर्षीय मुलीचा विनयभंग

प्रसिद्ध सिनेनिर्मात्याच्या ४ वर्षीय मुलीचा विनयभंग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

वांद्रे येथे एका प्रसिद्ध सिनेनिर्मात्याच्या चार वर्षांच्या मुलीचे गार्डनमध्येच एका 45 वर्षांच्या आरोपीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. हा प्रकार काही मुलांच्या लक्षात येताच आरोपीला जमावाकडून पकडून बेदम मारहाण केली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्कोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. 

वांद्रे येथे राहणार्‍या या निर्मात्याला चार वर्षांची एक मुलगी आहे. शनिवारी त्यांची पत्नी मुलीसोबत तेथीलच एका गार्डनमध्ये गेली होती. सर्व मुले खेळत असल्याने त्या त्यांच्याकडे पाहत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारीच त्यांची चार वर्षांची मुलगी होती. त्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येताच तिथे एक 45 वर्षांचा व्यक्ती आला. त्याने या मुलीला उचलले आणि तिच्याशी अश्‍लील चाळे करु लागला. हा प्रकार काही लहान मुलांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रारदार महिलेस या व्यक्तीविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या प्रॉडक्शन हाऊसच्या कर्मचार्‍याच्या मदतीने त्याला पकडले.