Fri, Apr 19, 2019 12:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टी फर्स्टसाठी मरे धावणार मध्यरात्री

थर्टी फर्स्टसाठी मरे धावणार मध्यरात्री

Published On: Dec 28 2017 1:30AM | Last Updated: Dec 28 2017 12:49AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली असून 31 डिसेंबरच्या नववर्ष स्वागतासाठी रात्री बाहेर पडणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 4 नवीन विशेष उपनगरीय गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्ंया सर्व स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून कल्याण, पनवेल मार्गावर या गाड्या चालवण्यात येणार असून त्या त्या मार्गावरील सर्वच स्थानकांवर थांबणार आहे कल्याण विशेष 0गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 01.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 03.00 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडी 01.30 वाजता कल्याणहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 03.00 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन विशेष :

पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 01.30 वाजता सुटेल व पनवेलला 02.50 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष पनवेल येथून 01.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 02.50 वाजता पोहोचेल. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.