Thu, Jul 09, 2020 09:38



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विक्रोळीत ट्रकखाली सापडून चौघांचा जागीच मृत्यू 

विक्रोळीत ट्रकखाली सापडून चौघांचा जागीच मृत्यू 

Published On: Apr 19 2019 9:34AM | Last Updated: Apr 19 2019 9:33AM




मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील विक्रोळी भागात धान्याने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर घाटकोपरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात विक्रोळीमधील सूर्यानगर पोलिस ठाण्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. धान्याने भरलेला ट्रक विक्रोळी पार्कसाईट परिसरातून जात होता. यावेळी ट्रकचे मागील चाक गटारात अडकले. त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चौघे ट्रकखाली सापडले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणच्या गटाराचे काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.