Sun, Aug 25, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीत ४ कोटी ९३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त 

अंधेरीत ४ कोटी ९३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त 

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 12:49AMजोगेश्‍वरी : प्रतिनिधी

अंधेरी मरोळ नाका येथील वीथ हॉटेलमध्ये हैद्राबादमधून आलेल्या तीन लोकांकडून एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी तब्बल 4 कोटी 93 लाख रुपयांच्या 500, 1000 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या. हॉटेलमध्ये राहणार्‍या व्यक्‍तींनी 10 टक्क्यांनी या नोटा बदलून देण्यास आणल्या असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटने  याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या रूममध्ये चौकशीसाठी गेले असता या व्यक्ती दरवाजा खोलत नव्हत्या. यावरून पोलिसांचा संशय बळावला. रुमची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात 1000 आणि 500 च्या जुन्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी तिघानाही ताब्यात घेतले असून ही रक्कम मोजली असता 4 कोटी 93 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. नेमके हे पैसे या व्यक्ती कशा बदलणार होते? या नोटा कुठून आल्या? त्यामध्ये आणखी कोण कोण सामील आहे? याचा तपास आता एमआयडीसी पोलीस करीत आहे.