Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत रात्रीच्या पार्किंगचे ४ हजार ५०० रु.

नवी मुंबईत रात्रीच्या पार्किंगचे ४ हजार ५०० रु.

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:22AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

नवी मुंबई महापालिकेने वाहन पार्किंगचा जिझिया कराचा अजब प्रस्ताव महासभे समोर प्रशासनाने सादर केला. शहरात रात्रीच्या वेळेत गृहनिर्माण संस्था व इतर ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्किंग करणार्‍यांना आता महिना साडेचार हजार रुपये कार पार्किंग कर भरावा लागणार आहे. तर मोटर सायकलला महिना पंधराशे रुपये भरावे लागणार आहेत. हे दर  रात्री 10 ते सकाळी 8 वाजे पर्यंतचे म्हणजे दहा तासाचे आकारले जाणार आहेत.

झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेते नवी मुंबई शहारात वाहनांची ही संख्या ही वाढली आहे. सन 1991 ते 2001 या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर 54.75 टक्के  व सन 2001 ते 2011 या काळात 37.11 टक्के वाढ झाल्याचे आढळून आले. यावरुन पुढील दोन दशकात म्हणजे 2031 पर्यंत नवी मुंबईची लोकसंख्या साधारण 25 लाख इतकी वाढण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. प्रत्येक दशकात 25 टक्के वाढ महापालिकेने अपेक्षित धरली आहे.  यामुळे शहरात पार्किंगची समस्याही गंभीर बनली आहे.शहरातील सर्व रस्ते दुतर्फा वाहनांच्या रंग लागलेल्या असतात. यामुळेच महापालिकेने वाहनांच्या खरेदीवर आणि वापरावर चाप बसावा यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे.  मात्र ज्या सोसायटीमध्ये कार पार्किंग नाही अशा वाहन धारकांना या पार्किंगच्या कराचा मोठा फटका बसणार आहे.

सिडकोने शहर वसवतांना सोसायटी मधील पार्किंगचा विचार केला नाही.  महापालिकेने इमारत उभारताना पार्किंग बंधनकारक केली नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का असा प्रश्‍न आता नवी मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.  महापालिकेच्या या झिझिया करामुळे नवी मुंबईकर मात्र संतप्त झाले आहेत. महापालिकेतर्फे हा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यात आला असून  येत्या महासभेत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.  मात्र सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताह फेटाळून लावावा अशी मागणी सर्व थरातून केली जात आहे.

Tags :  Navi Mumbai, night parking, 4,500 rupees, Mumbai news,