Thu, Mar 21, 2019 23:32
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये वर्षभरात 396 बालकांचा मृत्यू 

पालघरमध्ये वर्षभरात 396 बालकांचा मृत्यू 

Published On: Mar 14 2018 1:34AM | Last Updated: Mar 14 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांमुळे कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे. पालघरमध्ये गेल्या वर्षभरात 396 बालकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मात्र यामागे कुपोषण हेच कारण नाही तर अन्य कारणे असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले. 

पालघर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 5 हजार 542 कुपोषित बालकांची नोंद झाली तसंच एकाच महिन्यात 878 कुपोषित बालके आढळून आल्याबाबत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित करत कुपोषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगत पालघर जिल्ह्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात 4564 , डिसेंबर मध्ये 5442 तर जानेवारी महिन्यात  4540 कुपोषित बालकांची नोंद झाल्याचे स्पष्ट केले. 

वर्षभरात विविध कारणांमुळे 396 बालकांचा मृत्यू झाला. कुपोषण हे फक्त बालमृत्यूंचं कारण नसून निश्चित वेळेपूर्वी जन्मलेली बालके, ताप, न्यूमोनिया, डायरिया यांसारख्या इतर वैद्यकीय कारणांमुळे हे बालमृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितले.  कुपोषित बालकांवर योग्य उपचार होत आहेत. यामुळे गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी बघता कुपोषणात वाढ झाली नसल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.