Sun, Jan 19, 2020 21:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीत ३९ बारबालांची सुटका

कांदिवलीत ३९ बारबालांची सुटका

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 1:35AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कांदिवली परिसरातील नित्यानंद बारवरील कारवाईत शनिवारी रात्री समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी 57 जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चौदा अल्पवयीनसह 39 बारगर्लची सुटका केली आहे. अटकेनंतर 55 जणांना बोरिवली लोकल कोर्टाने न्यायालयीन तर बारचा मॅनेजरसह कॅशिअरला पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. दरम्यान बारमधून पोलिसांनी सुमारे 50 हजार रुपयांची कॅश तसेच म्युझिक साहित्य जप्त केले आहेत.

कांदिवलीतील हनुमाननगरात नित्यानंद बार अ‍ॅण्ड रेस्टॉॅरंट आहे. या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारगर्ल तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत अश्‍लील वर्तन करीत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर शनिवारी रात्री पावणेदहा वाजता पोलिसांनी एका विशेष मोहीमेतंर्गत छापा टाकला होता. या छाप्यात तिथे पोलिसांना 39 बारगर्ल सापडल्या, त्यात चौदा अल्पवयीन मुलींचा समावेश होता. यावेळी बारचा मॅनेजर, कॅशिअर, वेटर आणि ग्राहक अशा 57 जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी समतानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. रविवारी दुपारी अटक केलेल्या 57 जणांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी मॅनेजर आणि कॅशिअरला पोलीस तर इतरांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.