मुंबई : पुढारी ऑनलाईन
शीळ डायघर भागातील गौसिया कम्पाऊंड येथे भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत ३० ते ३५ गोदामे जळून खाक झाली आहेत.
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ३ अग्निशमनच्या गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनास्थळी असणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी काही गाड्या जाळून खाक झाल्या आहेत.
ही आग मोठी असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.