Sat, Apr 20, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवराज्याभिषेक : रायगडावर शिवभक्तांचा जल्लोष

शिवराज्याभिषेक : रायगडावर शिवभक्तांचा जल्लोष

Published On: Jun 06 2018 8:32AM | Last Updated: Jun 06 2018 4:40PMरायगड : पुढारी ऑनलाईन 

३४५ वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर सप्त नद्यांच्या अभिषेकामध्ये सार्वभौम राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता. बुधवारी हजारो शिवभक्‍तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या राजदराबारामध्ये तारखेनुसार अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छ. संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित होते.

शिवराज्याभिषेकदिनी लाखो शिवभक्‍तांनी रायगडावर गर्दी केली होती. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पाचाडपर्यंतच या वाहनांना प्रवेश देण्यात आला. तरीही शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांमुळे कोझर-रायगड घाटात वाहतूक कोंडी झाली त्यामुळे बरेच शिवभक्त घाटातच अडकून पडले.  

वाचा : पाच जून 'गड दिवस' म्‍हणून साजरा व्‍हावा : संभाजी राजे (Video)

पुणे : शिवराज्याभिषेक सोहळा; उभारली ५१ फुटी स्वराज्यगुढी!Photo

Update : 

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Photo)

*शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांमुळे कोझर-रायगड घाटात वाहतूक कोंडी 

*रायगडावर जल्लोष सुरु, पारंपारिक वाद्यांच्या तालावर शिवभक्तांनी धरला ठेका  

 

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/jCFDHeJquCs" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

*खासदार छ. संभाजीराजे यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकला  सुरुवात  

*वाचा : किल्ले रायगडावर आज 343 वा राज्याभिषेक सोहळा

*दुर्गराज रायगडावर शिवभक्तांचे आगमन होण्यास सुरुवात