Sun, Aug 18, 2019 21:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक : कल्याणमध्ये २४ तासांत तीन खून

धक्कादायक : कल्याणमध्ये २४ तासांत तीन खून

Published On: Feb 03 2018 3:50PM | Last Updated: Feb 03 2018 4:37PMकल्याण : वार्ताहर

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ 3 मधील महात्मा फुले, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाणे, तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हत्या झाली आहे. या हत्येमध्ये एक वृद्धाची  हत्या केवळ एक रुपया जास्त घेल्याच्या शुल्लक कारणावरून झाली तर उर्वरित दोन्ही हत्या पूर्ववैमन्यस्यातून झाली असल्याने  पोलिस यंत्रणा चांगलीच खळबळून जागी झाली आहे. 

शुक्रवारी कल्याण परिमंडळ 3 च्या हद्दीतील तीन हत्या झाल्या एका घटनेत कल्याण पुर्वेकडील आनंदवाडी परिसरात  क्रिकेट मॅचच्या जुन्या वादातून काल अशोक मालुसरे या तरुणाला गुरुवारी याच परिसरात राहणाऱ्या  तस्लीम शेख व लल्लन या दोघा जणांनी  बेदम मारहाण केली होती यात अशोकला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी  सायंकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी  या दोघा विरोधात कोळसेवाडी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. मयत अशोक मालुसरे हा हिंदुत्व वादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्या हत्येमुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुक्मिणी बाई रुग्णालयात एकच गर्दी केली होती. अद्यापही आरोपीना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केलेली नाही.

दुसऱ्या घटनेत कल्याण नजीक असलेल्या आंबिवली भागातील माणगाव परिसरात अस्वलसिंग व  सोनूसिंग हे दोघे एकमेकांच्या शेजारी राहत असून दोघेही शिकलगर समुदायाशी निगडित आहेत .या दोघा शेजाऱ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून भांडण होत असल्याने अखेरीस पूर्व वैमान्यस्यातुन सोनूसिंग या ३५ वर्षीय तरुणाची हत्या केली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास अस्वलसिंग याने धारदार शस्त्राने गंभीर जखमी केल्याची  घटना  घडली. जखमी अवस्थेत असलेल्या सोनूला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या हत्येप्रकरणी अस्वलसिंग याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सोनूच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केल्यानं परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. 

तिसऱ्या एका घटनेत महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण पश्चिमकडील रामबाग  परिसरात राहणारे मनोहर गामने (५६) या वृद्ध इसमनाने प्रभू जनरल स्टोअर्स  दुकानातून दोन अंडी खरेदि केली असता दुकानदराने  दोन अंडयांचे अकरा रुपये झाले.झाल्याचे सांगितल्याने दोन अंडी सर्वत्र दहा रुपयाला मिळतात मग एक रुपया तुम्ही जास्त का घेता असे मनोहर यांनी दुकानदाराला सांगितले असता दोघामध्ये वाढीव एका रुपयाच्या शुल्लक करणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन  रागाच्या भरात दुकानदारा व त्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोघांनी मिळून संतापाच्या भरात वृद्ध इसम मनोहरला मारहाण करीत जमिनीवर पडल्याने मर्मी घाव बसल्याने  त्यांचा जागीच मृत्यू झाला .महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी प्रभू जनरल स्टोअर्सच्या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस हत्या करणाऱ्या आरोपीचा कसून तपास करीत आहे .