Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीतून लागोपाठ 3 मुले बेपत्‍ता 

कल्याण-डोंबिवलीतून लागोपाठ 3 मुले बेपत्‍ता 

Published On: Mar 06 2018 9:06PM | Last Updated: Mar 06 2018 9:06PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण आणि डोंबिवली शहरातून लागोपाठ 3 मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्‍या आहेत. बेपत्ता झालेली ही मुले सापडली नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातील एका प्रकरणात अल्पवयीन तरूणीला पळवून नेणाऱ्याचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला आहे.

पश्चिम डोंबिवलीच्या रेतीबंदर रोडला मोठागाव येथील शिवशांती चाळीत राहणारी कविता साळवे (वय, 35) या महिलेच्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा १५ वर्षांचा मुलगा ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून क्लासहून परतत असताना बेपत्ता झाला. या संदर्भात फौजदार व्ही. के. पाटील व त्यांचे सहकारी या मुलाचा कसोशीने शोध घेत आहेत. 

दुसऱ्या घटनेत पूर्वेकडील खंबाळपाडा-कांचनगाव येथील साईराज पार्क सोसायटीत राहणारे भिकू केदारे (वय, 33) यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात आपला भाचा हरवल्‍याची तक्रार दाखल केली आहे. भिकू यांची मोठी बहीण सुनीता पांडे हिचा ११ वर्षीय मुलगा मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला. 

तिसऱ्या घटनेत कल्याण-शिळ मार्गावर नेतीवली येथील गणेश नगरात राहणारे रामदास पडवळ (वय, 48) यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार आपली मुलगी हरवल्‍याची तक्रार दाखल केली आहे. त्यांची १६ वर्षीय मुलगी १ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून घराजवळून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ही मुलगी सापडली नाही. आपल्या मुलीला उल्हासनगर - 3 येथील वाल्मिक नगरात राहणाऱ्या शिवा डंगेटी याने पळवून नेल्याचा संशय आल्‍यानंतर या प्रकरणी फौजदार एस. एस. केदार व त्यांचे सहकारी ममता आणि तिला पळविणारा अपरणकर्ता शिवा डंगेटी यांचा शोध घेत आहेत.