Sun, May 19, 2019 12:32
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : तीन दुचाकी चोरट्यांना अटक; २१ गाड्या जप्त

ठाणे : दुचाकी चोरट्यांना अटक; २१ गाड्या जप्त

Published On: Feb 12 2019 1:41PM | Last Updated: Feb 12 2019 1:41PM
ठाणे : पुढारी ऑनलाईन

ठाणे आणि कळवा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या ३ अट्टल दुचाकी चोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८ लाख २५ हजार किमतीच्या २१ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचे पोलिस उपायुक्त स्वामी यांनी सांगितले. 

शहरात गेल्या काही काळापासून दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे पोलिस चोरट्यांच्या शोधात होते. अखेर आज ठाणे आणि कळवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३ चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २१ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून अधिक चौकशी सुरू आहे.