Tue, Jul 23, 2019 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कान्स’ महोत्सवासाठी इडक, क्षितिज, पळशीची पी.टी.ची निवड

‘कान्स’ महोत्सवासाठी इडक, क्षितिज, पळशीची पी.टी.ची निवड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई :

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इडक, क्षितिज आणि पळशीची पी.टी. या  मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक 8 मे 2018 ते 18 मे 2018 या कालावधीत होणार्‍या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणार्‍या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.  या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटांसाठी 26 मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. या 26 चित्रपटांतून परीक्षण समितीने उपरोक्त 3 चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे.

यामध्ये इडक (मे.किया फिल्म्स प्रा.लि.), क्षितिज (मे.मीडिया फिल्म क्राफ्ट), पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन) हे तीन चित्रपट निवडण्यात आले. या परीक्षण समितीमध्ये 1) रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), 2)श्रीमती. रेखा देशपांडे, (चित्रपट समीक्षक),3) श्रीमती अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), 4) प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), 5) पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीने या 3 चित्रपटांची निवड केली आहे.

Selection, Edk, kshitij, Palshichi PT, Cannes Festival, mumbai news


  •