Tue, Jun 25, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : सुरुंग स्फोटात ३ ठार झाल्याची अफवा

मुंबई : सुरुंग स्फोटात ३ ठार झाल्याची अफवा

Published On: Jan 06 2018 6:50PM | Last Updated: Jan 06 2018 6:50PM

बुकमार्क करा
नवी मुंबई : पुढारी ऑनलाईन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील विकासपूर्व कामांमध्ये ब्लास्टिंगचे काम सुरू असताना उलवे टेकडीवरील साटजवळ काही दगड उसळून  सिडको आणि जी.व्ही.के चे  पाच अभियंते जखमी झाले आहेत. मात्र यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसून यात तीन जण मयत झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

साइटवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व काळजी घेण्यात येत असते त्यामुळे कुठलीही विशेष दुर्घटना झालेली नाही . दुर्घटनेत मयत झाल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे काहीही घडलेले नाही पाचही जण सुस्थितीत आहेत . त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

काही लोकांकडून अशा अफवा पसरल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे हा खुलासा करण्यात येत आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये अधिक माहितीकरिता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.