Thu, Aug 22, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यंदा पावसाळ्यात २८ महाकाय लाटा

यंदा पावसाळ्यात २८ महाकाय लाटा

Published On: Apr 19 2019 1:51AM | Last Updated: Apr 19 2019 2:42PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

येत्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 28 दिवस समुद्रात तब्बल 4.5 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. या महाकाय लाटा किनार्‍यावर थडकणार आहेत. या लाटा या गेल्या पावसाळ्यातील लाटांपेक्षा मोठ्या असतील.

समुद्रात उसळणार्‍या महाकाय लाटांच्या दरम्यान मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास मुंबईत पूर येण्याची शक्यता असून, महापालिका तसेच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यासारख्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

या कालावधीत दादर, माहिम, मरीनड्राईव्ह, वरळी, बांद्रा आणि जुहू या समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कचरा किंवा घाणीची समस्या उभी राहणार आहे. यावेळी महापालिकेच्या घनकचरा विभागाला युध्दपातळीवर कामाला लागावे लागणार आहे. 1 सप्टेंबर रोजी 4.91 मीटर उंचीच्या सर्वात उंच लाटा किनार्‍यावर थडकणार असल्याचा अंदाज आहेत.