Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आप जित गये!’ कसाबचे फाशीवेळीचे वक्तव्य 

‘आप जित गये!’ कसाबचे फाशीवेळीचे वक्तव्य 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनालईन 

मंबईत २६/११ ला दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यासाठी नेत असताना त्याने ‘आप जीत गये!’ असे वक्तव्य केल्याचे एका तपास अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी कसाब याला चार वर्षानंतर फाशी देण्यात आली होती. दरम्यान त्याची चौकशी करणारे पोलिस अधिकारी रमेश महाले यांनी आज एक नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले ‘ ज्यावेळी कसाबची चौकशी सुरु होती त्यावेळी कसाब म्हणाला होता की तुम्ही काय मला फाशी देणार, आठ वर्ष झाली तरी अजून तुम्ही अफजल गुरुला फाशी देऊ शकला नाही.’ त्यानंतर कसाबचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला ४ वर्षात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. 

कसाबला ज्यावेळी फाशी देण्यासाठी आर्थर रोड तुरुंगातून येरवडा तुरुंगात आणले जात होते. त्यावेळी रमेश महाले त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्यांनी त्याला त्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली आणि म्हणाले ‘तुला तर ४ वर्षातच फाशी होत आहे.’ त्यावेळी कसाब म्हणाला होता ‘ आप जीत गये !’     

उद्या २६/११ च्या दहशतवादी  हल्याला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. जरी या घटनेला ९ वर्ष लोटली असली तरी त्या हल्याच्या जखमा अजुनही ताज्या आहेत. २६/११ च्या रात्री झालेल्या गोळीबाराचे आवाज अजुनही कानात घुमतात. या हल्यात महाराष्ट्राने हेमंत करकरे, अशोक कामटे, आणि विजय साळसकर यांच्यासारखे तीन उत्तम अधिकारी आणि तुकाराम ओंबळे यांच्यासारखे जाबाज कॉन्सटेबल गमावले होते.