Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नागपाडा जंक्शनवर २५ मीटरवर फडकणार तिरंगा!

नागपाडा जंक्शनवर २५ मीटरवर फडकणार तिरंगा!

Published On: Apr 17 2018 2:27AM | Last Updated: Apr 17 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी 

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागपाडा जंक्शन येथे 25 मीटर उंच तिरंगा ध्वज फडकवण्यासह या जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या पर्यटन स्थळांमध्ये अजून एका पर्यटन स्थळांची भर पडणार आहे.

नागपाडा जंक्शनच्या सौंदर्यीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत आहे. अखेर समाजवादी पार्टीचे स्थानिक नगरसेवक रईस शेख यांच्या संकल्पनेतून येथे 25 मीटर उंच तिरंगा फडकवण्यासह या जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने तातडीने अर्थसंकल्पात या कामासाठी आर्थिक तरतूद करून अवघ्या काही दिवसातच या कामाची निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या कामाची संकल्पचित्रे हफिझ कॉन्ट्रक्टर या वास्तूविशारदने तयार केली आहेत. यासाठी पालिकेने 4 कोटी 10 लाख 20 हजार रुपये इतका खर्च येईल असे अपेक्षित धरले होते.

मात्र प्रत्यक्षात हे काम 9.99 टक्के चढ्या भावाने म्हणजेच 4 कोटी 51 लाख 18 हजार रुपयाला देण्यात आले आहे. येत्या 9 महिन्यात हे काम पुर्ण करण्याचे कंत्राटदारांना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी 2019 मध्ये नागपाडा जंक्शनचे सौंदर्य मुंबईकरांसह देशी-विदेशी पर्यटकांना न्याहाळता येईल. या सौदर्यीकरणात उद्यानासह नवोदित शायरांसाठी एक एंपीथिअटर तयार करण्यात येणार आहे. मोलाना आजाद, फुटबॉल आणि बास्केटबॉलची कलाकृती तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय सेल्फी पॉईट व जाँगिंग ट्रॅकही बांधण्यात येणार आहे. या चौकाला एतिहासिक महत्व आहे. आजादीच्या काळात येथे इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याचे महत्व लक्षात घेऊन, येथे तिरंगासह भव्य असे उद्यान उभारण्यात येणार असल्याचे रईस शेख यांनी सांगितले.

Tags : mumbai, 25 meter, Tricolor Flag, Nagpada junction, mumbai news