Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकवर व्यापार्‍याला लावला 25 लाखांना चुना

फेसबुकवर व्यापार्‍याला लावला 25 लाखांना चुना

Published On: Jul 15 2018 1:55AM | Last Updated: Jul 15 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

फेसबूकवरुन मैत्री करत तीघांनी केमिकल पाठविण्याच्या बहाण्याने गिरगावातील 52 वर्षीय व्यापार्‍याला तब्बल 25 लाख 62 चूना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गिरगावातील व्ही. पी. रोडवर असलेल्या शांतीभूवन इमारतीमध्ये व्यापारी उमेश पंडया (52) हे कुटूंबासोबत राहातात. व्यवसाय करण्याच्या बहाण्याने मार्च महिन्यात ज्युलीयट स्मीथ, भाग्यश्री वाला आणि मॉरीश गोलवंदे यांनी पंड्या यांच्याशी फेसबूकच्या माध्यमातून मैत्री केली. 

त्यानंतर तिघांनीही ब्रायन नावाचे केमिकल विकायच्या बहाण्याने गेल्या चार महिन्यांत पंड्या यांच्याजवळून तब्बल 25 लाख 62 हजार रुपये उकळले. पंड्या यांचा विश्‍वास बसावा म्हणून या ठगांनी त्यांना पुजारी हर्बल कंपनीची बनावट पावती देखील पाठविली. त्यानंतर ना केमिकल मिळाले. ना तिघांचाही फोन लागला.

फेसबूक अकाऊंटही बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने पंड्या यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पंड्या यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूकीच्या कलम 419, 420, 468, 471 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.