Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विविध अपघातांत २५ ठार

विविध अपघातांत २५ ठार

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 1:55AM नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्यात शुक्रवार संध्याकाळपासून चोवीस तासात तीन राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातांत 25 जण जागीच ठार झाले असून 47 जण जखमी झाले आहते. हे तीन अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड-लातूर, धुळे- पारोळा, औरंगाबाद -पैठण राज्य महामार्गावर झाले. 

तीनही अपघातांतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जखमी रुग्णांना जळकोट ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना मुखेड, जिल्हा नांदेड येथील खासगी दवाखान्यात तर काहींना औरंगाबाद, धुळे येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी औरंगाबाद-पैठण मार्गावर गेवराई तांडा समोर झालेल्या अपघातात नऊजण  ठार झाले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नोंदड मार्गावर लातूर-मुखेड मार्गावर लग्नाचे वर्‍हाड घेवून जाणार्‍या आयशर टेम्पो आणि टँकरच्या धडकेत 11 जणांचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत पावलेले सर्व जण मृत सर्व खरोसा (ता. औसा) येथील आहेत. लातूर - मुखेड रस्त्यावर जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील आहेत. 

शनिवारी पहाटे पाच वाजता धुळे- पाचोरा मार्गावर दळवेल ते मोढांळे दरम्यान मारुतीकारला ट्रकने धडक दिल्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा दत्त कॉलनीतील एकाच कुंटुबातील चालकासह पाचजण ठार झाले. हे वाणी कुटुंब भाचीच्या लग्नासाठी गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर ही घटना घडली.  तर जखमींना आजूबाजूच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात घडला. 

औरंगाबाद-पैठण मार्गावर झालेल्या अपघात जनार्दन अवचरमल (48), अनुजा अवचरमल (11), राम महेश प्यारेलाल ठाकूर (37), रामकुमारी ठाकूर (60), शिवलाल ठाकूर (34), शेकू गिंबडे( 75), अमीर शेख (23), पुष्पा ठाकूर(36) आणि युवराज ठाकूर ( 3) यांचा मृत्यू झाला.