Tue, Aug 20, 2019 04:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुढील वर्षासाठी २२ सुट्ट्या जाहीर

पुढील वर्षासाठी २२ सुट्ट्या जाहीर

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 1:54AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

येत्या 2018 सालात राज्य सरकारने 22 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. सरकारने जाहीर केलेल्या राजपत्रानुसार 22 दिवस सुट्टीचे आहेत. तर दोन सुट्ट्या या रविवारी आल्या आहेत. बँकांना त्यांचे वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी दि. 1 एप्रिल रोजी सुट्टी देण्यात आली आहे. 

26  जानेवारी प्रजासत्ताक दिन, 13 फेब्रुवारी महाशिवरात्र, 19 फेबुवारी शिवजयंती, 2 मार्च धुलीवंंदन, 29 मार्च महावीर जयंती, 30 मार्च गुडफ्रायडे, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 30 एप्रिल बुध्द पौर्णिमा, 1 मे महाराष्ट्र दिन, 16 जुन रमजान ईद, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 17 ऑगस्ट पारशी नववर्ष दिन, 22 ऑगस्ट बकरी ईद, 13 सप्टेंबर गणेश चतुर्थी, 20 सप्टेंबर मोहरम, 2 ऑक्टोबर   महात्मा गांधी जयंती, 18 ऑक्टोबर दसरा, 7 नोव्हेेंबर लक्ष्मीपूजन दिवाळी, 8 नोव्हेंबर दिवाळी  पाडवा, 21 नोव्हेंबर ईद ई मिलाद, 23 नोव्हेंबर गुरू नानक जयंती, 25 डिसेंबर नाताळ.