Sun, Jul 21, 2019 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देहू, आळंदी, पंढरपूरसाठी 212 कोटी

देहू, आळंदी, पंढरपूरसाठी 212 कोटी

Published On: Aug 25 2018 1:33AM | Last Updated: Aug 25 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

वारी मार्गाने पंढरपूरला जाणार्‍या लाखो वारकर्‍यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारने 212 कोटी रूपये मंजूर केले आहेत. देहू, आळंदी, पंढरपूर विकास आराखड्यातून ही कामे केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या शिखर समिती बैठकीच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्री बोलत होते. 

देहू ,आळंदी व  पंढरपूरच्या विकासासाठी  1 हजार 94 कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी 745 कोटी रूपये यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत. तर यावर्षी या योजनेतील पुढील टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी 212 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व विकास कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पालखी तळाच्या ठिकाणी व सरकारी मालकीच्या रिकाम्या  जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मोबाईल सुरक्षा युनिट स्थापन करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  देहू व आळंदी परिसरात केली जाणारी कामे, सदुंबरे विकास आराखडा व  भंडारा डोंगर विकास आराखड्यातील कामांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.या बैठकीत सेवाग्राम विकासासाठी 17 कोटींचा निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

212 कोटीतून ही होणार कामे 

नामदेव स्मारक उभारणी 

चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिर सुधारणा

नविन बसस्थानक वाहनतळाचे काँक्रीटीकरण

वाळवंट सुधारणा कार्यक्रम 

खासगी मठ व वाड्यांमध्ये शौचालये बांधणे 

पालखी मार्गावर शौचालयांची व्यवस्था