Mon, May 20, 2019 08:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २१ किलो गांजासह रिक्षाचालक अटकेत

२१ किलो गांजासह रिक्षाचालक अटकेत

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:31AMउल्हासनगर ः वार्ताहर 

दोन मोठ्या प्रवासी बॅगमध्ये तब्बल 21 किलो वजनाचा सव्वातीन लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा विक्रीसाठी बाळगणार्‍या उल्हासनगरातील एका रिक्षाचालकाला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प 4 येथील सुभाष टेकडी परिसरात राहणार्‍या गणेश शेट्टी नावाच्या रिक्षाचालकाकडे गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, अशरुद्दीन शेख, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक गणेश तोरगल, उदय पालांडे, आर.टी.चव्हाण, एस.के.पवार, रमजू सौदागर, महाशब्दे, माळी, जी.के.जंगम, जगदीश कुलकर्णी, जावेद मुलानी, एन.एन.वाघमारे, डी.बी.भोसले यांनी गणेश शेट्टी याच्या घरावर छापा मारला. 

घराची झडती घेतली असता दोन मोठ्या प्रवासी बॅगमध्ये अंदाजे 21 किलोच्या वर सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा गांजा आढळून आला. टेकडी परिसरात गांजा विकण्यासाठी ठेवण्यात आला होता, अशी कबुलीही शेट्टी याने दिली आहे. 14 मेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Tags : Mumbai, mumbai news, rickshaw driver arrested, 21 kg ganja,