Fri, Jul 03, 2020 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात आणखी २०९१ रुग्ण सापडले, बाधितांची संख्या ५४,७५८

राज्यात आणखी २०९१ रुग्ण सापडले, बाधितांची संख्या ५४,७५८

Last Updated: May 26 2020 10:10PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार  4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यात मंगळवारी 97 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची एकूण संख्या 1792 झाली आहे. मंगळवारी नोंद करण्यात आलेल्या मृतांपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 39, पुण्यात 8, ठाणे  शहरात 15, औरंगाबाद शहरात 5, सोलापूरात 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 10, मीरा-भाईंदरमध्ये 5, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी 3, नागपूर शहरात 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू  झाला आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका : 32,974 (1065)

ठाणे : 484 (5)

ठाणे मनपा : 2866 (52)

नवी मुंबई मनपा : 2154 (32)

कल्याण डोंबिवली मनपा : 989 (18)

उल्हासनगर मनपा : 198 (6)

भिवंडी निजामपूर मनपा : 99 (3)

मीरा भाईंदर मनपा : 525 (10)

पालघर :122  (3)

वसई विरार मनपा: 630 (15)

रायगड : 471 (5)

पनवेल मनपा : 374 (12)

ठाणे मंडळ एकूण : 41,886 (1226)

नाशिक : 123

नाशिक मनपा : 147 (2)

मालेगाव मनपा: 722 (47)

अहमदनगर : 64 (5)

अहमदनगर मनपा : 20

धुळे : 29 (3)

धुळे मनपा : 100 (6)

जळगाव : 324 (36)

जळगाव मनपा : 123 (5)

नंदूरबार : 32 (2)

नाशिक मंडळ एकूण : 1684 (106)

पुणे : 383 (7)

पुणे मनपा: 5602 (268)

पिंपरी चिंचवड मनपा: 350 (7)

सोलापूर: 25 (2)

सोलापूर मनपा:621 (47)

सातारा: 339 (5)

पुणे मंडळ एकूण: 7320 (336)

कोल्हापूर:312 (1)

कोल्हापूर मनपा: 28

सांगली: 76

सांगली मिरज कुपवाड मनपा: 11 (1)

सिंधुदुर्ग: 19

रत्नागिरी:  171 (5)

कोल्हापूर मंडळ एकूण : 617 (7)

औरंगाबाद : 26 (1)

औरंगाबाद मनपा : 1284 (52)

जालना: 73

हिंगोली: 133

परभणी: 19 (1)

परभणी  मनपा: 6

औरंगाबाद मंडळ एकूण : 1541(54)

लातूर: 74 (3)

लातूर मनपा : 8

उस्मानाबाद: 37

बीड: 32

नांदेड: 19

नांदेड मनपा: 86 (5)

लातूर मंडळ एकूण : 256 (8)

अकोला: 39 (2)

अकोला मनपा: 398 (15)

अमरावती: 16 (2)

अमरावती मनपा:  177 (12)

यवतमाळ: 115

बुलढाणा :49 (3)

वाशिम: 8

अकोला मंडळ एकूण:802 (34)

नागपूर: 9

नागपूर मनपा: 472 (8)

वर्धा: 7 (1)

भंडारा: 14

गोंदिया: 47

चंद्रपूर:  16

चंद्रपूर मनपा: 9

गडचिरोली: 26

नागपूर मंडळ एकूण : 600 (9)

इतर राज्ये: 52 (12)

एकूण 54 हजार 758 (1792)