Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद 

शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद 

Published On: Mar 09 2018 5:32PM | Last Updated: Mar 09 2018 5:10PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपला सलग चौथा अर्थसंकल्प सादर केला. केंद्राच्या अर्थसंकल्प जसा शेती केंद्रीत होती  तसा राज्याचाही अर्थसंकल्प शेती केंद्रित होता. या अर्थसंकल्पात अरबी समुद्रात तयार करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठ्या स्मारकासाठी महत्वाची घोषणा करण्यात आली. २०१८ -१९ च्या आर्थिक बजेटमध्ये शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे. 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अरबीसमुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलच्या जागेत उभे राहणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी निधीची घोषणा केली. शिवस्मराकासाठी ३०० कोटींची तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर राज्य सरकार राज्यातील थोर व्यक्तीबाबतचे साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवणार आहे .