मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कारागृहांच्या सभोवताली उंच इमारती उभारण्यावर घालण्यात आलेले निर्बंध लवकरच शिथिल करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. या निर्बंधांमुळे मुंबईत भायखळा, आर्थर रोड जेल तसेच अन्य कारागृह परिसरातील इमारतींची दुरवस्था झाली असून, कारागृहांपासून दीडशे मीटरच्या पलिकडे विकास कामांना परवानगी देण्याचा लवकरच निर्णय देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आर्थर रोड जेल आणि भायखळा तुरुंगाच्या परिसरातील अंदाजे 20 हजारांवर मुंबईकरांची तुरुंगातून सुटका होऊ घातली आहे.
कारागृहाच्या परिसरात उंच इमारतींचे बांधकाम करण्यास मनाई केली आहे. यामुळे भायखळा कारागृहाच्या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. धोकदायक व मोडकळीस आलेल्या इमारतीमधील लोकांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता कारागृहाच्या परिसरातील इमारतींच्या रखडलेल्या विकासाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केली.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारागृहाला लागून असलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. मध्यंतरीच्या काळात काही ठिकाणी परवान्या देण्यात आल्या, त्यावर उच्च न्यायालयाने काही आक्षेप घेतले होते. यामुळे नवीन विकास कामांना परवानग्या देण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नगरविकास विभागाने एक समिती स्थापन करून कारागृहांच्या परिसरात 500 मिटर ऐवजी 150 मिटरच्या पलिकडे बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने यासंदर्भात काही आक्षेप घेतले आहेत, त्यावर एक समिती नेमून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कारागृहाच्या परिसरात काही ठिकाणी 33/9 ची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार भाडेकरून दुसर्या ठिकाणी शिफ्ट झाले आहेत.
Tags : mumbai news, 20,000 mumbai people, rescued, jail,
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM