Wed, Nov 14, 2018 06:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : नांदिवली नाल्यात दोघे बेपत्ता; शोध सुरु

डोंबिवली : नांदिवली नाल्यात दोघे बेपत्ता; शोध सुरु

Published On: Jul 11 2018 8:24AM | Last Updated: Jul 11 2018 8:23AMठाणे : पुढारी ऑनलाईन

दोन दिवस जोरदार पडलेल्या पावसाने डोंबिवलीतील तुडूंब नाले भरले असून या नाल्यात २ जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नाल्यात काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास  मित्राला वाचवण्यासाठी उडी मारलेला मित्रही नाल्यात वाहून गेला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षद नावाचा एक तरुण नाल्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मित्रानेही नाल्यात उडी मारली. पण पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. केडीएमसीच्या अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता तरुणांचा शोध सुरु आहे. रबर बोट आणि सर्चलाईटविनाच अग्नीशमन दलाचे 2-4 जवानच सर्च ऑपरेशन करत होते. रात्री उशिरापर्यंत दोघाही तरूणांचा शोध लागला नव्हता. मात्र अग्नीशमनदलाचे जवान फक्त बघ्याची भुमिका घेतअसल्याचा आरोप स्थानिक करत होते.