मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात एचआयव्ही बाधित रूग्णांची संख्या सूमारे 2 लाख 51 हजार 848 इतकी असून एचआयव्ही बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडुन मिळणारी आर्थिक मदत कमी पडत असल्याची माहिती शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पिपल लिविंग विथ एचआयव्ही,एडस संस्थेचे निमंत्रक श्री. प्रशांत येंडे यांनी दिली.
आमची संघटना 2001 पासुन एडस संसर्गित व्यक्तिच्या आयुष्यमान उंचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, इत्यादीचा लाभ मिळण्या करीता वार्षिक उत्पनाचा निकष सन 1980 पासुन 21000 रूपये असुन 2017 ला पण हाच निकष पारित आहेत. शासनाने अजुन बदल केलेला नसल्याने गरीब गरजू व निराधर व्यक्तींना शासनामार्फत वार्षिक 21,000 रूपयाचे उत्पान्नाचा दाखला मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. 1980 च्या दरापेक्षा आता 2017 ला दर दहापट वाढलेले आहेत, असे प्रशांत येंडे यांनी सांगितले.
गरीब व्यक्ती सुध्दा दिवसाला 100 रूपये कमवतो. तर महिन्याला 3,000 रूपये होतात तर वर्षाला 36000 रूपये होतात. यामुळे शासनाने वार्षीक उत्पन्न 1 लाख रूपये करावे. जेणेकरून या गरीब व निराधार व्यक्तिना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळेल. महाराष्ट्रात एकूण 2 लाख 36 हजार 275 एवढे एडसचे रूग्ण आहेत. यात 114819 पुरुष, 121456 महीला असून यात 51004 विधवा महीला, 15571 मुले ( वय 0 ते 15 पर्यंत ) ऐवढे एचआयव्ही ग्रस्त व्यक्ती आहेत.