Sun, Aug 25, 2019 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलला लवकरच 2 वातानुकूलित डबे!

लोकलला लवकरच 2 वातानुकूलित डबे!

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:01AMमुंबई : वृत्तसंस्था

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात संपूर्ण वातानुकूलित रेल्वे आणल्यानंतर आता पश्‍चिम रेल्वेतर्फे नियमित धावणार्‍या लोकललाच दोन वातानुकूलित डबे जोडण्याचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. हा प्रयोग केवळ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये मुंबईत आणखी दोन वातानुकूलित रेल्वे येणार आहेत. त्यानंतर 2018 च्या अखेरपर्यंत वातानुकूलित डबे लोकलला जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही लोकलला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहिले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

सध्या धावत असलेल्या वातानुकूलित रेल्वेमध्ये सेकंड क्‍लास एसी डब्यांचा समावेश करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाचा विचार सुरू असल्याचे अलिकडेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नमूद केले होते. असे असले तरी वातानुकूलित रेल्वेमध्ये सेकंड क्‍लास एसी डब्यांचा समावेश करणे किंवा नेहमीच्या लोकलला सेकंड क्‍लास वातानुकूलित डबे जोडण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले.