होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘जेईई मेन’मध्ये २,३१,०२४ विद्यार्थी पात्र!

‘जेईई मेन’मध्ये २,३१,०२४ विद्यार्थी पात्र!

Published On: May 01 2018 1:45AM | Last Updated: May 01 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी 

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (मेन) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून अांध्र प्रदेश येथील भोगी सूरज कृष्णा 360 गुण मिळवून देशात पहिला आला. मुंबईतील आयआयटी पेसमधील विद्यार्थी तथागत वर्मा, अव्यक्ता व्रत, अंतर्व बेलोस्कर, साई किरण आदी विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. यंदा या परीक्षेतून एकूण 2 लाख 31 हजार 24 विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा 20 मे रोजी होणार आहे.

देशातील आयआयटी, ट्रिपल आयटी, एनआयटी, सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेली ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई) मंडळाकडून घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून 11 लाख 35 हजार 084 विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी ऑनलाईन परीक्षेसाठी 2 लाख 16 हजार 755 तर ऑफलाईन परीक्षेला 8 लाख 57 हजार 564 इतक्या विद्यार्थ्यी बसले होते. 

गेल्या 8 एप्रिल रोजी ही परीक्षा देशभरात झाली होती. त्यापैकी जेईई मेन पेपर 1 चा निकाल सोमवारी मंडळाने जाहीर केला आहे. तर पेपर 2 चा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे.  या परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी जेईई-अ‍ॅडव्हान्स या परीक्षेकरिता विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार खुल्या गटाकरिता 74 ही गुणांची कटऑफ आहे. तर इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) 45, अनुसूचित जातींकरिता (एससी) 29 आणि अनुसूचित जमातींकरिता (एसटी) 24 ही कटऑफ जाहीर करण्यात आली आहे. या कटऑफनुसार देशभरातून जेईई-अ‍ॅडव्हान्सकरिता 2 लाख 31 हजार 24 पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, 2,3,024 student, eligible, JEE Main,