धारावीत कोरोनाचे १९ नवे रुग्ण; संख्या १८४९ वर

Last Updated: Jun 04 2020 1:03AM
Responsive image


धारावी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव धारावीत कायम असून गेल्या चोवीस तासात 19 जणांना जणांना लागण झाली आहे. यामुळे बुधवारी बाधीतांची एकूण संख्या 1 हजार 849 झाली असून आजवर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधीतांवर पालिका कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यात येत असून शेजार्‍यांना होम क्वारनटाईन करण्यात आले आहे. धारावीत कोरोनाने थैमान घातल्याने महाराष्ट्र शासन व आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली असून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाचे संकट त्यातच पावसाळ्याचे आगमन तोंडावर आले असतांना मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे अजूनही झालेली नाहीत. त्यामुळे येत्या काळात धारावीत आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

येथील वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याविषयी जनजागृती तसेच कॅम्प लावून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र रुग्णाच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ होतच आहे. पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला यासह साथीचे आजार डोके वर काढत असल्याने कोरोनाची लक्षणे समजून डॉक्टर कोविड रुग्णालयात भरती करतील या भीतीने अनेक नागरिक धारावी सोडण्याचा विचारात आहेत.