Sun, Nov 18, 2018 23:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऊस उत्पादकांचे १९ हजार थकले : पासवान

ऊस उत्पादकांचे १९ हजार थकले : पासवान

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

देशभरात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे सुमारे 19 हजार कोटी रुपये थकले असून, साखर उद्योगाला मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने सातत्याने घेतल्याची माहिती केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चालू हंगामात मागणीपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाल्यामुळे साखरेच्या किमती घसरल्या असून, त्याचा विपरीत परिणाम या उद्योगावर झाला आहे. त्यामुळे देशभरात ऊस उत्पादकांचे 19 हजार कोटी रुपये थकले आहेत. महाराष्ट्र सरकारने ‘आधार’संदर्भात केलेल्या कामाचे कौतुक करून पासवान म्हणाले की, यामुळे बोगस 50 लाख रेशनकार्डे रद्द झाली आहेत. त्याचा फायदा पात्र लोकांना मिळत आहे. महाराष्ट्रात पॉस मशिनमुळे कोणत्याही दुकानातून धान्य खरेदीची सुविधा यामुळे उपलब्ध झाल्याचेही ते म्हणाले. भारतीय अन्‍न महामंडळाच्या  सर्व डेपोचे कामकाज हे ऑनलाईन  करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags : Mumbai, mumbai news, Ram Vilas Paswan, 19,000 tired, sugarcane grower,