Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीच्या कचरा व्यवस्थापनासाठी १८३ कोटी

कल्याण-डोंबिवलीच्या कचरा व्यवस्थापनासाठी १८३ कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

कल्याण डोंबिवलीतील आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. हे लक्षा घेता शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी 183 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 700 मेट्रिक टनचे तीन प्रकल्प या शहरासाठी उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा देखील निश्‍चित करण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत अल्पलालीन चर्चे दरम्यान दिली. 

कल्याण-डोंबिवलीतील आधारवाडी डंम्पिंग ग्राऊंडची क्षमता दहा वर्षांपूर्वीच संपली आहे. त्यानंतरही शहरातील कचरा विल्हेवाट लावण्याची पर्यायी व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून सातत्याने आगीच्या घटना त्या ठिकाणी घडत असतानाही पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपयोजना केली जात नाही. कचरा वाहतूक करणार्‍यांशी प्रशासनातील अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्याने शहरातील कचरा कोंडीच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे यांनी अल्पकालीन सूचनेच्या माध्यमातून केली. 

यावर उत्तर देताना राज्यमंत्री पाटील यांनी आधार वाडी डंम्पिंग ग्राऊंडची क्षमता 550 मेट्रिक टन आहे. त्यातही 275 मेट्रिक टन ओला आणि 275 मेट्रिक टन सुका कचरा अशी विभागणी करण्यात येते. यातील फक्त 10 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते ही वस्तूस्थिती आहे. या शहरातील कचर्‍याचा गंभीर प्रश्‍न विचारात घेऊन 700 मेट्रिक टन क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या हिश्शाचे 29 कोटी उपलब्ध झाले आहेत. मात्र पालिकेने स्वत:चा हिस्सा अद्याप दिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कचरा गोळा करणे वाहतूक करणे, प्रक्रिया करणे अशा 152 प्रकल्पांसाठी 1856 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. 

Tags : waste management, 183 crore, Kalyan-Dombivli, 


  •