Sun, Jul 21, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनो बंद झाल्याने १८ हजार प्रवासी त्रस्त

मोनो बंद झाल्याने १८ हजार प्रवासी त्रस्त

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 1:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

सुमारे महिन्याभरापूर्वी लागलेल्या आगीमुळे चेंबुर ते वडाळादरम्यान धावणारी मोनो सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे. एमएमआरडीएने अद्याप ही सेवा सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने या मार्गावर दररोज प्रवास करणार्‍या सुमारे अठरा हजार प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्राधिकरणालाही 25 कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.   

म्हैसुर कॉलनी स्थानकादरम्यान मोनो रेलला आग लागली होती. या आगीमध्ये मोनोरेलचे दोन डब्बे जळून खाक झाले होते. मोनोरेलचा पहिला टप्पा कधीपर्यंत सुरू होईल याबाबत अद्याप प्राधिकरणाद्वारे काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. मोनोची तपासणी झाल्याशिवाय ही सेवा सुरू करता येणार नाही. अद्याप पाचपैकी तीन गाड्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरीत दोन गाड्यांची तपासणी सुरू असून लवकरच ही तपासणी पुर्ण करण्यात येणार आहे, मात्र ही सेवा कधीपर्यंत सुरू करण्यात येईल हे मात्र प्राधिकरणाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

तसेच याचवेळी आगीसारख्या दुर्घटनेशी सामना करण्यासाठी मोनो प्रकल्पातील आपत्कालीन यंत्रणाही फेल ठरल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यावर अंतीम अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसून या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.