Tue, Jul 07, 2020 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत कोरोनाचे १८ नवे रुग्ण

धारावीत कोरोनाचे १८ नवे रुग्ण

Last Updated: May 31 2020 12:54AM
धारावी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या धारावीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 18 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 733 वर पोहचला असून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 71 वर गेला आहे. 

संपूर्ण देशाचे लक्ष धारावीकडे लागले असताना कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी मिशन धारावी अंतर्गत राज्य शासन व मनपा प्रशासनाच्यावतीने अनेक उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. रोज आढळणार्‍या नव्या रुग्णांच्या संकेत हळू हळू घट होताना दिसते आहे. 

शनिवारी सापडलेल्या रुग्णांना रुग्ण संपर्कातूनच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या घरच्यांसह शेजार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
धारावीतील वाढत्या आकड्यांची शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून शनिवारी धारावी शहिद गोपीनाथ कॉलनी परिसरातील शास्त्रीनगर भागात आय. सी. एम. आर. लॅब च्या वतीने नॅशनल सिरो सर्व्हेलन्स स्टडीच्या डॉक्टरांनी कोरोना चाचणी अंतर्गत शेकडो रहिवाशांची रोग प्रतिकार शक्ती तपासण्यासाठी रक्त चाचणी घेण्यात आली. हा कोरोना चाचणीचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले.