Mon, Mar 25, 2019 13:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००%

ठाण्यात १७ महाविद्यालयांचा निकाल १००%

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे महापालिका क्षेत्रात 9 हजार 505 मुले  आणि 8 हजार 681 मुली परिक्षेला बसले होते. त्यापैकी 8 हजार 176 मुले आणि 7 हजार 971 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील तब्बल 17 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.  

या गुणवंत महाविद्यालयांमध्ये सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या तिन्ही विभागांचा समावेश असून सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान शाखा, न्यु कळवा हायस्कूल विज्ञान शाखा, अब्दुल्ला पटेल ज्यु. कॉलेज विज्ञान व वाणिज्य शाखा, वसंतविहार हायस्कूल व ज्यु. कॉलेज विज्ञान आणि वाणिज्य शाखा, न्यु इंग्लिश स्कूल कळवा, शुभम राजे ज्यु. कॉलेज, पातलीपाडा, क्वीन्स मेरी ज्युनिअर कॉलेज,  ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, एनकेटी वाणिज्य विभाग, कळव्यातील लक्ष्मी विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, मुंब्रा पब्लिक गर्ल ज्यु. कॉलेज,  सेंट झेविअर आझादनगर, एस. इंग्लिश मिडियम शिवाईनगर,  नेट किडस पॅराडाईज ज्यु. कॉलेज, फातिमा इंग्लिश स्कूल,  क्रिसेंट इंग्लिश हायस्कूल, अग्रसेन हायस्कूल ज्यु. कॉलेज यांचा समावेश आहे. 

शहापुर तालुक्यातील मुली हुशार 

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलींचा निकाल 92.29 टक्के लालागला असून सर्वाधिक शहापुरमधील तब्बल 94.71 टक्के विद्यार्थीनीं बाजी मारून आघाडी घेतली. जिल्ह्यात प्रथम येण्याची परंपरा शहापूरकर मुलींनी कायम राखली.  जिल्ह्यातील 41 हजार 798 मुलींपैकी 38 हजार 576 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कला शाखेतून 14 हजार 415 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी 11 हजार 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेतील 45 हजार 409 विद्यार्थ्यांपैकी 40 हजार 170 विद्यार्थी पास झाले आहेत. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल 36.93 टक्के लागला आहे.  परिक्षेला बसलेल्या 5 हजार 294  विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातही सर्वाधिक मुलीच उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालातही घसरण झाली आहे.