Tue, Jul 07, 2020 04:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोनाचे १५१० नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे १५१० नवे रुग्ण

Last Updated: May 31 2020 1:23AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचे 2940 नवे रुग्ण शनिवारी समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या 65 हजार 168 वर पोहोचली आहे. मुंबईतही शनिवारी कोरोनाच्या 1510 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 38 हजार442 वर पोहोचली आहे. 

मुंबईत 24 तासांत कोरोनाने 54 जणांचे बळी घेतल्याची नोंद झाली. यातील 14 जणांचा मृत्यू 25 ते 28 मे दरम्यान झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत आतापर्यंत 227 रुग्णांचा मृत्यू झाला असून 16 हजार 364 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी 356 रुग्ण बरे झाले.

मृत्यू पावलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यभरात 28 हजार 81 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून 34 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 681 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी 99 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यात मुंबई 54, ठाणे 6, वसई-विरार 7, नवी मुंबई 2, रायगड 3, पनवेल 7, कल्याण-डोंबिवली 2, जळगाव 3, पुणे 6, सोलापूर 6, नागपूर-1, इतर राज्ये-2 राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये, तर बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. एकूण मृत्यूंची संख्या ही आता 2197 झाली आहे.