Sun, Nov 18, 2018 14:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 15 वर्षांच्या मुलावर चेंबूरमध्ये लैंगिक अत्याचार

15 वर्षांच्या मुलावर चेंबूरमध्ये लैंगिक अत्याचार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:19AMमुंबई : प्रतिनिधी

नैसर्गिक विधीसाठी घराजवळील सार्वजनीक शौचालयामध्ये गेलेल्या 15 वर्षीय मुलाचे अपहरण करत एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरणासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून टिळकनगर पोलिसांनी आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

चेंबूरच्या पेस्तम सागर रोड परिसरात कुटूंबासोबत राहात असलेला 15 वर्षीय पिडीत मुलगा येथील शाळेमध्ये शिकतो. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तो नैसर्गिक विधीसाठी घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेला होता. मुलगा एकटाच असल्याचे हेरून याच परिसरात राहात असलेल्या संदीप जयस्वाल (28) याने त्याला उचलून येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे या नराधमाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन याची वाच्यता न करण्यास धमकावले.

मुलाच्या आईची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी आरोपी जयस्वाल याच्याविरोधात अपहरणाच्या भादंवी कलम 363 यासह पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करत आरोपी जयस्वालला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जयस्वाल हा व्यवसायाने वेल्डर असून पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे.