Wed, Jan 16, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावती’साठी आज १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट

‘पद्मावती’साठी आज १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

‘पद्मावती’च्या वादावरून चित्रपटसृष्टीतील संघटनांनी रविवारी 15 मिनिटांसाठी ब्लॅकआऊटची हाक दिली आहे. या कालावधीत देशभरात कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती चित्रपट संघटनांनी दिली. ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीकाही करण्यात आली.

पद्मावती चित्रपटाविरोधात देशभर सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रविवारी दुपारी 3 वाजता गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संघटनांसह सर्व ज्युनियर कलाकार एकत्र येऊन निषेध व्यक्त करणार आहेत.

चित्रनगरीत सुमारे 1500 कामगारांची असलेली ज्युनिअर कलाकारांची युनियन पूर्ण ताकदीने संजय लीला भन्साळी  यांच्या समर्थनार्थ उतरणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली. कामगारांच्या हिताला प्राधान्य देत असल्याने भन्साळी यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बॉलीवूड कलाकारांनी याआधीच भन्साळी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मत व्यक्त केले जावे आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा, अशी मागणी अनेक कलाकारांनी केली आहे. वाटल्यास ठिकठिकाणी पद्मावतीच्या खास शोचे आयोजन केले जावे, असे अनेक कलाकारांनी सांगितले.