Sun, Nov 18, 2018 20:08



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओव्हरहेडला चिकटून हार्बरवर 5 वर्षांत 143 तरुणांचा मृत्यू

ओव्हरहेडला चिकटून हार्बरवर 5 वर्षांत 143 तरुणांचा मृत्यू

Published On: Sep 13 2018 2:14AM | Last Updated: Sep 13 2018 2:06AM



मुंबई : प्रतिनिधी

मुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफलाइन आहे. दररोज 80 लाखांपेक्षा जास्त  प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांतून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरीच गर्दी असते,  ज्यामुळे प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले करतबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वेगाड्यांतून पडून किंवा शॉक लागून  मरतात. गेल्या पाच वर्षांत ओव्हरहेड वायरचा शॉक लागून 143 तरुण प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उजेडात आली. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले, याबाबत माहिती विचारली होती. सदर माहितीसंदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सन 2013 पासून  मे 2018 पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण 143 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 138 प्रवासी  जखमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थाकांन दरम्यान एकूण 67 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 52 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान  एकूण 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 31 प्रवासी  जखमी झाले आहे. तसेच हार्बर रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते पनवेल  स्थानकांदरम्यान एकूण 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 39 प्रवासी  जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर हेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण 11  प्रवाशांचा मृत्यू व 6 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण 5 प्रवाशांचा मृत्यू व 14 प्रवासी जखमी झाले आहे.

तसेच मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये 2017 साली रेल्वेनगाड्यातून पडून 3014 प्रवासी मृत्यू पावले. तर 3345 प्रवासी जखमी झाले आहे. मध्य रेल्वेमार्गावर गाड्यातून पडून 1534 प्रवासी मृत्यू पावले तर 1435 प्रवासी जखमी झाले आहे. आणि पश्चिम  रेल्वमार्गावर गाड्यातून पडून 1086 प्रवासी मृत्यू पावले आणि 1540  प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय रेल्वेमार्गावर गाड्यातून पडून 394 प्रवासी मृत्यू पावले आणि 370 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यांतून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी  कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.

गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणार्‍या रहिवासी यांनी आप-आपल्या  मुलांना ताकीद देण्याची गरज आहे की, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि करतबबाजीसुद्धा करू नये. तसेच  शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे की, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमैन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी केली आहे.