Sat, Oct 19, 2019 05:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरे कारशेड परिसरात २१ प्रजातींचे १४३ दुर्मीळ पक्षी

आरे कारशेड भागात २१ प्रजातींचे १४३ दुर्मीळ पक्षी

Published On: Sep 18 2019 2:02AM | Last Updated: Sep 18 2019 2:02AM
जोगेश्वरी : पुढारी वार्ताहर

आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या दोन किलोमीटरच्या परिघात 125 मिनिटांमध्ये 21 वेगवेगळ्या प्रजातींच्या 143 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. रॉच्या पथकातील सदस्य जयराज नायक यांनी नियमित बर्डिंग सत्रासाठी रविवारी स. 7 च्या दरम्यान आपल्या सहकार्‍यांसह आरे कॉलनीला भेट दिली. यावेळी फक्‍त दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी 21 प्रजातींच्या 143 वेगवेगळ्या पक्ष्यांची नोंद केली. 

आरे कारशेड परिसरात योग्य पद्धतीने निरीक्षण झाले, तर सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री अशा विविध वेळी प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटक दिसू शकतील, असे मत नायक यांनी व्यक्त केले. यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही निरीक्षणे नोंदवावी, ही निरीक्षणे नंतर अधिकार्‍यांनाही पाठवता येतील. आरेमध्ये दिसणारे प्राणी, पक्षी यांची शास्त्रीयदृष्ट्या नोंदणी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.